राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन धोरण (2009)
राष्ट्रीय आपत्ती धोरणाचा (एनपीडीएम) उद्देश व्यापक, स्वयंप्रेरित तसेच तंत्रज्ञान-आधारित धोरणाद्वारे सुरक्षित तसेच आपत्तींना पुरून उरणारा भारत बनवणे हे आहे. ह्या धोरणात आपत्ती रोखणे, त्यांचे सौम्यीकरण, आपत्तींना तोंड द्यायची तयारी तसेच द्यावयाचा प्रतिसाद ह्यावर भर देण्यात आला आहे. सदर धोरणात राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवरील विविध संस्थांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या गेल्या आहेत. यामध्ये पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा समावेश आहे. सदर धोरण असुरक्षित समूह तसेच स्थानिक समुदायांचा सक्रीय सहभाग ह्यांसह सर्वसमावेशक करण्यावर भर देण्यात आला आहे. राष्ट्रीय आपत्ती धोरणामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यात पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव किंवा उत्तरदायित्वाला प्रोत्साहन मिळते.