बंद

    कोंकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प

    महाराष्ट्र सरकारने कोकणातील पाच किनारी जिल्ह्यांमध्ये (पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) चक्रीवादळे, पूर, भूस्खलन, समुद्री भरती यांसारख्या आपत्तींचा धोका कमी करण्यासाठी कोंकण सौम्यीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून संरक्षण करणारे बंधारे, धूप प्रतिबंधक बंधारे, विद्युत तारांचे भूमिगत केबलिंग, बहुपयोगी चक्रीवादळ निवारे तसेच भूस्खलन प्रतिबंधक उपाययोजना यांसारख्या व्यापक संरचनात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. ह्यामुळे या भागांवर परिणाम करणारे धोके आणि असुरक्षिततेमुळे निर्माण होणारी जोखीम कमी होते.

    सदरच्या उपाययोजना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एनडीएमए) सौम्यीकरण मार्गदर्शक सूचनांनुसार आखण्यात करण्यात आल्या असून त्यांचा उद्देश जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळणे आहे. या प्रकल्पांमुळे किनारावर्ती महाराष्ट्रातील नागरिकांची आपत्ती प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होईल.