अद्ययावत आपत्ती प्रतिसाद उपकरणे
आपत्तींचे बदलते स्वरूप आणि तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर, प्रभावी आणि अद्यायावत प्रतिसाद सामग्री/साधने/यंत्रे आपत्ती प्रतिसादासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. ती जीव वाचवण्यासाठी, हानी कमी करण्यासाठी आणि जलद व कार्यक्षम मदत कार्य जसे की बचावकार्य, स्थलांतर, वैद्यकीय सेवा आणि संपर्क सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असतात. अशा प्रतिसाद सामग्री/साधनांचे महत्व लक्षात घेऊन, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाने विविध आपत्ती प्रतिसाद दल जसे कि भारतीय सैन्य,एनडीआरएफ, एसडीआरएफ, डीडीएमए आणि अग्निशमन व सार्वजनिक आरोग्य विभाग यांसारख्या महत्त्वाच्या भागीदारांना प्रभावी आणि अद्यायावत आपत्ती प्रतिसाद सामग्री/साधने/यंत्रे उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे आपत्ती व्यवस्थापनासाठी संबंधित यंत्रणांची प्रतिसाद क्षमता बळकट होईल. या संदर्भातील काही महत्त्वपूर्ण उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत –
- नागपूर जिल्ह्यातील कोलार नदीवर “वॉटर पूल” प्रशिक्षण सुविधा उभारणीसाठी सहाय्य (एनडीआरएफ)
- राज्यातील आपत्ती-प्रवण गावांसाठी “आपत्ती प्रतिसाद साधनसंच (किट)” (ग्रामीण विकास विभाग)
- शोध व बचाव सामग्री/साधने/यंत्रे (भारतीय सैन्य)
- लाइफ डिटेक्शन सिस्टम, पीडित स्थाननिर्धारण चित्रक (कॅमेरा) आणि अन्य सामग्री/साधने/यंत्रे (एनडीआरएफ)
- शोध आणि बचाव सामग्री/साधने/यंत्रे (एसडीआरएफ)
- शोध आणि बचाव सामग्री/साधने/यंत्रे (डीडीएमए)
- मिनी फायर रेस्क्यू टेंडर, वॉटर मिस्ट मोटरबाइक्स, फायर रेस्क्यू सूट्स आणि अन्य सामग्री/साधने/यंत्रे (शहरी स्थानिक संस्था)
- तात्पुरती निवारा केंद्रे (सार्वजनिक आरोग्य विभागासाठी)