भारत आपत्ती संसाधन (आयडीआरएन) हा आपत्कालीन प्रतिसादासाठी आवश्यक उपकरणे, कुशल मनुष्यबळ आणि महत्त्वपूर्ण पुरवठ्यांच्या सूचीचे व्यवस्थापन करणारा आंतरजाल (वेब)-आधारित मंच (प्लॅटफॉर्म) आहे. भारत आपत्ती संसाधन जाळे संस्थळ (पोर्टल) चा मुख्य उद्देश आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेली संसाधने आणि आवश्यक मनुष्यबळाच्या उपलब्धतेचे व्यवस्थापन करणे हा आहे. ह्या विदासाठा ( डेटाबेस) मुळे विशिष्ट आपत्तींसाठी तयार राहण्याच्या क्षमतेचे मूल्यमापन करण्यास मदत होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे (डीडीएमए) आपत्कालीन सहाय्य कर्मचारी आणि इतर भागधारकांकडून डेटा संकलित करून आयडीआरएन पोर्टल नियमितपणे अद्ययावत ठेवतात.