बंद

    दृष्टी आणि ध्येय

    दृष्टिकोन

    जीवित, उपजीविका आणि मालमत्तेचे नुकसान कमीत कमी व्हावे ह्यासाठी महाराष्ट्रातील आपत्ती जोखीम व्यवस्थापन (भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यावरणीय धोके विचारात घेऊन) अधिक सक्षम बनवणे.”

    ध्येय

    महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सर्वसमावेशक नियोजन, क्षमता बांधणी आणि भागधारकांच्या सहकार्याने आपत्तींचा धोका व परिणाम कमी करण्यासाठी कटिबद्ध आहे.

    आम्ही पुढील गोष्टींसाठी प्रयत्नबध्द आहोत:

    • गटागटांमध्ये आपत्तींचे संभाव्य धोके आणि त्याचे परिणाम याबद्दल जागरूकता निर्माण करून त्याबद्दल समज वाढविणे.
    • धोक्याची तीव्रता आणि विश्लेषणावर आधारित परिणामकारक आपत्ती पूर्वतयारी आणि प्रतिसाद योजना विकसित करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे.
    • परिणामकारक आपत्ती व्यवस्थापनासाठी स्थानिक अधिकारी, आपत्कालीन प्रतिसादकर्ते आणि सामुदायिक (गटनिहाय) संघटनांची क्षमता वृद्धींगत करणे.
    • आपत्तींना देण्यात येणारा प्रतिसाद एकात्मिक आणि समन्वित करण्यासाठी सरकारी तसेच स्वयंसेवी संस्था, खाजगी क्षेत्रातील संस्था आणि नागरी समाज यांच्यात भागीदारी आणि समन्वय वाढविणे.
    • आपत्ती व्यवस्थापन प्रयत्नांदरम्यान संवेदनक्षमता, शाश्वतता आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देणारी धोरणे आणि उपक्रमांचा प्रचार करणे.
    • शिकलेला धडा तसेच सर्वोत्तम पद्धतींवर आधारित असलेल्या योजना, कार्यपद्धती आणि प्रणालींचे सतत मूल्यांकन करून त्यात सुधारणा करणे.
    • आपत्तीग्रस्त व्यक्ती आणि समुदायांना/ गटांना त्यांच्या पुनर्बांधणी आणि पुनर्वसन प्रयत्नांमध्ये सक्षम करणे आणि आधार देणे, त्यांना आत्मसन्मान, अधिकार आणि आवश्यक सेवांचा लाभ मिळवून देणे.
    • आपत्ती व्यवस्थापन ही सामायिक जबाबदारी आहे हे रुजवण्यासाठी समाजातील सर्व घटकांमध्ये पूर्वतयारी, संवेदनक्षमता आणि एकात्मतेची संस्कृती जोपासणे.