या व्हिडिओमध्ये डीआरएबीसी पद्धतीसह मूलभूत प्राथमिक उपचार आणि आपत्कालीन प्रतिसादाच्या तंत्रांविषयी मार्गदर्शन दिले आहे. संकटाच्या क्षणी योग्य व तत्काळ प्रतिसाद दिल्यास जीव वाचवता येऊ शकतो.
या व्हिडिओमध्ये आपत्कालीन प्रशिक्षणाचे महत्त्व आणि समुदाय सहभागामुळे तयारी कशी सुधारते, यावर प्रकाश टाकला आहे. प्रभावी प्रतिसादासाठी आवश्यक सूचना व टाळावयाच्या कृतीही दिल्या आहेत.
या व्हिडिओमध्ये आपत्कालीन परिस्थितीत लक्षात ठेवावयाच्या अत्यावश्यक वस्तू आणि खबरदारीबाबत माहिती दिली आहे. आवश्यक साहित्य आणि कृतीची रूपरेषा तयार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
हा व्हिडिओ आपत्कालीन परिस्थितीत मृत व्यक्तींची सन्माननीय व सुरक्षित विल्हेवाट कशी लावावी हे सांगतो, तसेच सार्वजनिक आरोग्य व सन्मान राखण्यासाठी काय करावे व टाळावे हे स्पष्ट करतो.
या व्हिडिओमध्ये आपत्कालीन परिस्थितीत बचाव पथकांची भूमिका आणि जनतेच्या सहकार्याचे महत्त्व सांगितले आहे. सतर्कता, सुरक्षिततेचे नियम आणि योग्य कृती यावर भर देण्यात आला आहे.
हा व्हिडिओ आपत्कालीन परिस्थितीत जबाबदार संवाद कसा साधावा, काय करावे व टाळावे, तसेच एनडीएमए, एसडीएमए आणि इतर शासकीय स्रोतांद्वारेच माहिती कशी द्यावी हे सांगतो.
या व्हिडिओमध्ये अपघाताच्या वेळी किंवा आपत्तीच्या वेळी काय करावे आणि काय करू नये या संबंधित माहिती देण्यात आली आहे. शांत राहणे, योग्य निर्णय घेणे आणि वेळेवर कृती करणे यामुळे अधिक जीव वाचवू शकतो.