बंद

    सोलापूर जिल्हा: प्रतिबंध, भागीदारी आणि जनकेंद्रित नियोजन | श्री सिद्धेश्वर यात्रा 2026 आपदा मित्र कृती: शून्य-अपघात व सुरक्षित गर्दीचे व्यवस्थापन मॉडेल

    श्री सिद्धेश्वर यात्रा ही एक वार्षिक धार्मिक यात्रा आहे जी सोलापूरला अंदाजे 10-15 लाख भाविकांना आकर्षित करते. श्री सिद्धेश्वर यात्रेतील अक्षता आणि मंदिर परिसरातील भाविक व यात्रेकरू तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर जमत असल्याने गर्दीसह तलावात उतरणाऱ्या भाविकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात आव्हाने निर्माण होतात. सोलापूर जिल्हा प्रशासनाने, सोलापूर महानगरपालिका आणि सिद्धेश्वर मंदिर ट्रस्टच्या सहकार्याने शून्य जीवितहानी व समुदाय केंद्रित आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी प्रशिक्षित आपदा मित्र तैनात केले. यावर्षी यात्रेदरम्यान प्रभावी आपत्ती तयारीसह प्रतिबंध, भागीदारी आणि जनकेंद्रित नियोजनाचा समन्वय दिसून आला.