आपत्ती धोका कमी करण्याच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रम
मा. जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद (IAS) व मा. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. रोहितकुमार राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती तयारीवरील प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
एनडीआरएफ, यूएनडीपी व एमएनजीएल नाशिक यांच्या तज्ञ सत्रांद्वारे बचाव, सुरक्षितता व आपत्ती जोखीम कमी करण्यावर भर देण्यात आला.
मा. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. रोहितकुमार राजपूत यांनी आंतरराष्ट्रीय आपत्ती धोका कमीकरण दिनानिमित्त नाशिक येथे आयोजित आपत्ती तयारी व जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन केले.
नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आयोजित आपत्ती तयारी कार्यक्रमा दरम्यान पुणे येथील एनडीआरएफ पथकाकडून एमआरएफ, सीपीआर आणि आपत्कालीन प्रतिसाद यावरील प्रशिक्षण व प्रात्यक्षिक सत्र आयोजित करण्यात आले.
नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आयोजित आपत्ती तयारी प्रशिक्षणा दरम्यान पुणे येथील एनडीआरएफ पथकाकडून एमआरएफ आणि सीपीआरसारख्या जीवनरक्षक तंत्रांचे प्रात्यक्षिक पाहताना सहभागी
यूएनडीपीचे सिटी प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर श्री. मुद्दसर यांनी आंतरराष्ट्रीय आपत्ती धोका कमीकरण दिनानिमित्त नाशिक येथे आयोजित प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमात “आपत्ती नाही, लवचिकता घडवा” या विषयावर सादरीकरण केले