उर्वरित महाराष्ट्रातील आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प
उर्वरित महाराष्ट्रातील संरचनात्मक सौम्यीकरण प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी सदर प्रकल्प आखण्यात आले आहेत. या अंतर्गत ज्या संरचनात्मक सौम्यीकरण प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे त्यात पूर संरक्षण भिंत, धारण भिंत, तलाव दुरुस्ती कामे आणि पुराच्या पाण्यासाठी जलनिःसारण प्रणाली यांचा समावेश आहे. या उपाययोजनांमुळे पूर आणि भूस्खलन यांसारख्या आपत्तींचा परिणाम कमी होईल. हे प्रकल्प 2024 ते 2026 या कालावधीत राबवले जात असून, यामुळे उर्वरित महाराष्ट्रातील 11.5 कोटी लोकांची आपत्ती प्रतिकार क्षमता विकसित होण्यास मदत होईल.