बंद

    काय करावे आणि काय करणे टाळावे

    एनडीएमएने दिलेले ‘काय करावे आणि काय करणे टाळावे’ असे निर्देश खालीलप्रमाणे आहेत:

    काय करावे आणि काय करणे टाळावे

    उष्मालाटेमुळे शारीरिक ताण येऊन त्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. उष्मालाटेदरम्यान होणारा परिणाम कमी करण्यासाठी आणि उष्माघातामुळे होणारे गंभीर आजार किंवा मृत्यू टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाय करता येतील:

    • उन्हात बाहेर जाणे टाळावे. खास करून दुपारी 12.00 ते 3.00 दरम्यान बाहेर जाणे टाळावे.
    • तहान लागली असताना किंवा नसतानाही पुरेसे पाणी शक्य तितक्या वेळा पिणे.
    • वजनाने हलके, हलक्या रंगाचे, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे परिधान करणे. उन्हात बाहेर पडताना संरक्षक गॉगल्स, छत्री/टोपी, शूज किंवा चप्पल वापरणे.
    • बाहेरील तापमान जास्त असताना तीव्र व्यायाम किंवा खडतर कामे टाळणे. दुपारी 12.00 ते 3.00 ह्या वेळात बाहेर काम करणे टाळावे.
    • प्रवास करताना सोबत पाणी घेणे.
    • मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड (कृत्रिम शीतपेये) पेये टाळणे, कारण ती प्यायल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. (डिहायड्रेशन होते)
    • जास्त प्रथिनेयुक्त अन्न खाणे तसेच शिळे अन्न खाणे टाळावे.
    • तुम्ही बाहेर काम करत असाल तर टोपी किंवा छत्री वापरणे त्याचप्रमाणे डोके, मान, चेहरा आणि अंगावर ओलसर कापड वापरणे.
    • लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना पार्क केलेल्या वाहनांमधे एकटे सोडू नये.
    • अशक्तपणा जाणवत असल्यास किंवा बरे वाटत नसल्यास ताबडतोब डॉक्टरकडे जाणे.
    • ओआरएस तसेच लस्सी, तांदळाची पेज, लिंबू पाणी, ताक इत्यादी शरीर पुन्हा हायड्रेट होण्यास मदत करणारी घरगुती पेये घेणे.
    • प्राणी सावलीत बांधून त्यांना पिण्यासाठी भरपूर पाणी देणे.
    • आपले घर थंड ठेवणे, पडदे, खिडकीवरील झडपा किंवा सनशेड ह्यांचा वापर करणे आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवणे.
    • पंखे वापरणे तसेच ओलसर कपडे वापरणे आणि वेळोवेळी थंड पाण्याने आंघोळ करणे.

    उष्माघाताने बाधित झालेल्या व्यक्तीवर उपचार करण्यासाठी उपयुक्त सूचना

    • बाधित व्यक्तीला थंड जागी सावलीत झोपवणे. तिचे अंग ओल्या टॉवेलने पुसत रहाणे किंवा वारंवार आंघोळ घालणे. डोक्यावर साधारण तापमान असलेले पाणी ओतावे. सदर व्यक्तीच्या शरीराचे तापमान कमी करणे महत्वाचे असते.

    • सदर व्यक्तीला शरीरातील पाण्याची पातळी भरून काढण्यासाठी ओआरएस किंवा लिंबू सरबत अथवा कोणतेही उपयुक्त पेय देणे.
    • सदर व्यक्तीला त्वरित जवळील आरोग्य केंद्रात घेऊन जाणे. अशा वेळी रुग्णाला तात्काळ रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते.

    काय करावे आणि काय करणे टाळावे

    जर आपल्या भागात पूर येण्याची शक्यता असेल तर

    • माहितीकरता आकाशवाणी किंवा दूरचित्रवाणी ऐकणे.
    • पूर अचानक येण्याची शक्यता असते हे ध्यानात ठेवणे. असे घडण्याची शक्यता असल्यास त्वरित उंचावरील भागात जाऊन थांबणे, यासाठी स्थलांतराच्या सूचनांची वाट पाहू नये.
    • ओढे, जलनिःसारण वाहिन्या, खोलगट भाग तसेच अचानक पूर येण्याची शक्यता असलेल्या इतर भागांबद्दल सतर्क रहाणे. अशा ठिकाणी पावसाचे ढग जमणे किंवा अतिवृष्टी असे पुराचे इशारे न मिळताही अकस्मात पूर येऊ शकतो.

    स्थलांतर करायचे झाल्यास

    • आपले घर सुरक्षित ठेवणे. वेळ मिळाल्यास बाहेरील वस्तू आत आणणे. सर्व आवश्यक चीजवस्तू वरच्या मजल्यावर हलवणे.
    • तुम्हाला सूचना मिळाल्यास आवश्यक उपकरणे मुख्य स्विच किंवा व्हॉल्व फिरवून बंद करणे. विद्युत उपकरणांचा विद्युत पुरवठा खंडित करणे. तुम्ही भिजलेले असल्यास किंवा पाण्यात उभे असल्यास विद्युत उपकरणांना स्पर्श करू नये.

    घर सोडावयाचे झाल्यास स्थलांतरासाठी पुढील उपयुक्त सूचना लक्षात ठेवणे:

    • वाहत्या पाण्यातून चालण्याचा प्रयत्न करू नये. सहा इंच उंचीपर्यंतच्या वाहत्या पाण्यामुळे पडण्याची शक्यता असते. पाण्यातुन चालायचे झाल्यास पाणी वाहते नसलेल्या भागातून जा. आपल्यासमोरील जमिनीची दृढता तपासण्यासाठी काठीचा वापर करणे.

    • पुराने वेढलेल्या भागातून गाडी चालवणे टाळावे. आपल्या वाहनाभोवती पुराच्या पाण्याची पातळी वाढू लागल्यास त्वरित गाडी तिथेच सोडून देऊन जमल्यास सुरक्षितपणे उंच ठिकाणी आसरा घेणे. अन्यथा तुम्ही आणि तुमचे वाहन पटकन वाहून जायची शक्यता असते.

    नागरी भागातील पूर

    पूराअगोदर

    • कचरा, प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या गटारे/ नाल्यांमध्ये टाकू नये
    • भरती आणि अतिवृष्टी एकाच वेळी होत असल्यास शक्यतो घरातच थांबायचा प्रयत्न करणे
    • ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन ह्यावरील हवामानाचा अंदाज ऐकणे. त्याचप्रमाणे वेळोवेळी महापालिकेसारख्या संस्थांकडून मिळणाऱ्या संदेशांनुसार कृती करणे.
    • सखल भाग सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे.
    • घराबाहेर पडताना किंवा स्थलांतर करताना प्रत्येक व्यक्तीकडे कंदील, टॉर्च, थोडेफार खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी, कोरडे कपडे आणि आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करून घेणे.
    • प्रत्येक कुटुंब सदस्याचे ओळख पात्र सोबत असल्याची खात्री करून घेणे.
    • घरातील सर्व मौल्यवान वस्तू घरातील उंच ठिकाणी ठेवून देणे.

    पूर परिस्थितीत

    • सुरक्षित जागी पोहोचून योग्य माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणे.
    • विद्युत उपकरणांचा वीज पुरवठा खंडित करणे व उघड्या तारांना स्पर्श होऊ न देणे.
    • अफवांवर विश्वास न ठेवणे तसेच अफवा न पसरवणे.

    पूरानंतर

    हे करावे

    • क्लोरीनयुक्त किंवा उकळलेले पाणी पिणे.
    • स्वच्छ आणि सुरक्षित अन्न सेवन करणे.
    • पाण्याचे साठे किंवा साचलेल्या पाण्यावर कीटकनाशकांची फवारणी करणे.
    • विद्युत आणि गॅस उपकरणे बंद करणे तसेच ह्या पुरवठ्याचा मेन्स स्विचही बंद करणे.
    • तुमचा आपत्कालीन साधनसामुग्री संच जवळ बाळगणे तसेच तुमच्या जायच्या ठिकाणाबद्दल तुमचे मित्र व कुटुंबीयांना कळवणे.
    • पुराच्या पाण्याचा स्पर्श टाळा. हे पाणी दूषित असू शकते.
    • साचलेल्या पाण्यातून चालावे लागल्यास, खोल पाणी, उघडी गटारे किंवा खड्ड्यांमधे पडू नये यासाठी काठी किंवा दांडीचा वापर करणे.
    • विद्युत तारांपासून दूर रहाणे. विद्युत प्रवाह पाण्यात उतरू शकतो. खालपर्यंत लोंबणाऱ्या तारांची माहिती विद्युत कंपनीला कळवणे.
    • पाऊल टाकण्याआधी काळजी घेणे. जमीन तसेच फरशी कचऱ्याने भरून गेल्यावर त्यात तुटक्या फुटक्या बाटल्या, तीक्ष्ण वस्तू, खिळे आदींचा समावेश असू शकतो. चिखल तसेच कचऱ्याने भरलेली जमीन आणि फरशी घसरड्या झालेल्या असू शकतात.

    • छतावर पाणी असल्यास विद्युतपुरवठा बंद करणे. पाणी असलेल्या ठिकाणाखाली एक बादली ठेऊन साचलेल्या पाण्याचा दबाव हलका करण्यासाठी छताला छिद्र पाडणे.
    • क्षतिग्रस्त खोल्यांमधील अधिकाधिक पाणी काढून टाकण्यासाठी बादल्या, टॉवेल तसेच पोतेऱ्यांचा वापर करणे.

    हे टाळावे

    • वाहत्या पाण्यातून चालू नये. पाण्याचे प्रवाह फसवे असतात तसेच उथळ आणि जलद वाहणाऱ्या पाण्यामुळे आपले पाय घसरू शकतात.
    • जलद वाहणाऱ्या पाण्यात पोहू नये. ह्यात आपण वाहून जाऊ शकतो किंवा पाण्यातली एखादी वस्तू आपल्यावर आदळू शकते.
    • पुराने वेढलेल्या भागात वाहन चालवणे टाळावे. अचानक वाढणारे पाणी लक्षात येत नाही आणि पुराचे जेमतेम अर्धा मीटर पाणी वाहन ओढून नेऊ शकते.
    • पुराच्या पाण्याचा स्पर्श झालेले कोणत्याची प्रकारचे अन्न खाणे टाळावे.
    • विद्युतपुरवठ्यासंदर्भात पात्र अभियंत्याने तपासणी केल्याशिवाय पुनर्जोडणी टाळणे. गॅस गळतीबाबत सजग रहाणे – मेणबत्या, कंदील किंवा उघड्यावर जाळ करणे टाळावे.
    • छताला लावलेली उपकरणे चालू करू नयेत. मोडकळीला आलेल्या छतांपासून दूर राहाणे.
    • ओलसर जमिनींवर खास करून काँक्रीट पृष्ठभागावर उभे राहून टीव्ही, व्हीसीआरएस, सीआरटी टर्मिनल किंवा इतर विद्युत उपकरणांचा वापर टाळणे.
    • तळघरात साचलेले पाणी शीघ्र गतीने काढू नये. पाण्याचा दाब जर लवकर कमी झाला तर यामुळे भिंतींवर अवाजवी ताण येऊ शकतो.

    काय करावे आणि काय करणे टाळावे

    हे करावे

    • हवामान विभाग किंवा वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने डोंगराळ भागातल्या प्रवासाची आखणी करणे.
    • वेळ न दवडता दरडी कोसळत असलेल्या/ भूस्खलन होत असलेल्या मार्गापासून किंवा प्रवाहाच्या दिशेने असणाऱ्या दऱ्यांपासून दूर जाणे.
    • नाले स्वच्छ ठेवणे,
    • कचरा, पाने, प्लॅस्टिक पिशव्या, ढिगारा इ. साठी नाल्यांची तपासणी करणे.
    • जल निःसारण छिद्र उघडी ठेवणे.
    • मुळांद्वारे माती धरून ठेवू शकणारी अधिकाधिक झाडे लावणे,
    • दरडी कोसळण्याच्या तसेच इमारती भुईसपाट होण्याच्या जागा, भूस्खलनाच्या सूचना देणारे तडे जणू घ्या आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा. नदीच्या गढूळ पाण्यामुळेही वरच्या बाजूला होत असलेल्या भूस्खलनाचे संकेत मिळतात.

    • असे संकेत जाणून घेऊन (त्यासंबंधी) नजिकच्या तहसील किंवा जिल्हा मुख्यालयाला भेट देणे.
    • उताराचा तळ उखडला जाणार नाही, व तो संरक्षित राहील ह्याकडे लक्ष देणे, पुनर्वनीकरणाची योजना नसेल तर झाडे समूळ उपटू नयेत.
    • झाडांच्या तडकण्याच्या किंवा शीळा एकमेकांवर घासल्या जाण्यासारख्या नेहमीपेक्षा निराळ्या आवाजांकडे लक्ष देणे.
    • आघातादरम्यान किंवा त्याच्या शक्यतेदरम्यान सतर्क, जागरूक आणि सक्रिय (3ए च्या) रहाणे.
    • निवारे शोधून तिथे जाणे,
    • शक्यतोवर आपले कुटुंब तसेच सहकाऱ्यांसोबत थांबायचा प्रयत्न करणे.
    • जखमी आणि अडकलेल्या व्यक्तींचा जरूर शोध घेणे.
    • आपल्या लक्ष्य – अनुसरणाचा मार्ग लक्षात ठेवणे ह्यामुळे जंगलात वाट चुकून हरवणार नाही.
    • उडणाऱ्या हेलिकॉप्टरला आणि बचाव पथकाला आणीबाणीच्या काळात खाणाखुणा कश्या करावयाच्या किंवा संपर्क कसा साधायचा हे जाणून घेणे.

    हे टाळावे

    • असुरक्षित भागात बांधकाम करण्याचा आणि रहाण्याचा प्रयत्न करणे टाळावे.
    • घाबरून जाऊ नये
    • ढिसाळ साहित्य तसेच विद्युत तारा किंवा खांब ह्यांना स्पर्श करू नये किंवा त्यावरून चालूही नये.
    • तीव्र उतारांवर आणि पाणी निचरा होण्याच्या मार्गांवर घरे बांधू नयेत.
    • नद्या, झरे अथवा विहिरींचे दूषित पाणी थेट पिऊ नये.
    • जखमी व्यक्तीच्या जीवाला तात्काळ धोका नसल्यास तिच्यावर प्रथमोपचार केल्याशिवाय तिथून हलवू नये.

    काय करावे आणि काय करणे टाळावे

    भूकंपादरम्यान काय करावे

    भूकंपादरम्यान अधिकाधिक सुरक्षित राहायचा प्रयत्न करणे. कधी कधी काही भूकंप हे पूर्वकंप असू शकतात आणि त्यानंतर मोठा भूकंप होऊन शकतो हे ध्यानात घेणे. कमीतकमी हालचाल करून जवळपासच्या सुरक्षित जागी पोहोचा आणि भूकंप थांबेपर्यंत तसेच बाहेर पडणे सुरक्षित असल्याबद्दलची आपली खात्री पटेपर्यंत घरातच थांबणे.

    घरात असल्यास

    • जमिनीवर पडून रहा. दणकट टेबल किंवा एखाद्या फर्निचरखाली आधार घेणे. भूकंप थांबेपर्यंत तिथेच थांबणे. आपल्या जवळपास टेबल किंवा देश न आढळल्यास आपला चेहरा आणि डोके हातांनी झाकून घेऊन इमारतीच्या आतील बाजूच्या कोपऱ्यात बसून रहाणे.

    • आतील बाजूच्या दरवाज्याच्या चौकटीखाली, खोलीच्या कोपऱ्यात, टेबलाखाली किंवा अगदी पलंगाखाली जाऊन स्वतःचा जीव वाचवणे.
    • काचा, खिडक्या, बाहेरील दरवाजे तसेच भिंती आणि दिवे किंवा फर्निचर ह्यांसारख्या पशु शकणाऱ्या गोष्टींपासून दूर रहाणे.
    • भूकंप होताना तुम्ही पलंगावर असाल तर तिथेच पडून रहाणे. तुमच्या डोक्याचे संरक्षण करण्यासाठी उशीने झाकून घेणे. तुम्ही दिव्याखाली असाल तर तो पडू शकतो, अशा वेळी आजूबाजूच्या सुरक्षित ठिकाणी जाणे.

    • दरवाजाची चौकट तुमच्या जवळपास असेल आणि ती मजबूत तसेच भार धारण करणारी चौकट आहे हे तुम्हाला माहित असेल तरच तिचा संरक्षणाकरता आडोसा म्हणून वापर करणे.
    • भूकंप थांबत नाही तोपर्यंत आणि बाहेर जाणे सुरक्षित होईपर्यंत घरातच थांबणे. संशोधनाद्वारे असे दिसून आले आहे की जेंव्हा लोक इमारतीच्या आतमढे असताना दुसऱ्या जागी जायचा प्रयत्न करतात किंवा बाहेर पडायचा प्रयत्न करतात तेंव्हा जखमींची संख्या सर्वाधिक असते.

    • वीज जाऊ शकते किंवा स्प्रिंकलर सिस्टम किंवा फायर अलार्म चालू होऊ शकतात हे लक्षात ठेवणे.

    घराबाहेर असल्यास

    • तुम्ही जिथे आहात त्या जागेवरून हलू नये. मात्र, इमारती, झाडे, पथदिवे आणि वीज वाहक तारांपासून दूर जाणे.
    • तुम्ही मोकळया जागेत असाल तर भूकंप चालू असेपर्यंत तिथे थांबणे. सर्वाधिक धोका इमारतींच्या बाहेरील भागात असतो : इमारतीतून बाहेर पडायच्या ठिकाणी आणि बाहेरील भिंतींजवळ. भूकंपाशी संबंधित होणारी बहुतांश जीवितहानी कोसळणाऱ्या भिंती, उडून पडणाऱ्या काचा व पडणाऱ्या वस्तूंमुळे होत असते.

    चालत्या वाहनात असल्यास

    • सुरक्षितपणे जेवढ्या त्वरेने थांबता येईल तसे थांबणे आणि वाहनातच बसून रहाणे. इमारती, झाडे, उड्डाणपूल तसेच वीज वाहक तारांजवळ अथवा त्या खाली थांबणे टाळावे.
    • भूकंपाचे धक्के थांबल्यानंतर सावधपणे पुढे जाणे. अशावेळी भूकंपामुळे नुकसान झालेले रस्ते, पूल किंवा उतार टाळणे.

    ढिगाऱ्याखाली अडकल्यास

    • माचिस पेटवू नये.
    • फिरू नये किंवा धूळ झटकू नये.
    • पाईप किंवा भिंतीवर टकटक आवाज केल्यास बचावकर्ते तुमचा शोध घेऊन शकतील. तुमच्यापाशी शिट्टीअसेल तर वाजवा. केवळ शेवटचा उपाय म्हणून ओरडा. कारण ओरडल्यामुळे धूळ नाकातोंडात जाईल.

    काय करावे आणि काय करू नये

    चक्रीवादळाआधी

    • घराची तपासणी करणे. सैल झालेल्या फरशा ठीकठाक करणे त्याचप्रमाणे दारवंजे, खिडक्यांची डागडुजी करून घेणे.
    • घराच्या सभोवतालच्या वाळलेल्या फांद्या अथवा सुकलेली झाडे काढून टाकणे. लाकडाचे ढिगारे, हलणारे पत्रे, किरकोळ विटा, कचऱ्याचे डबे, जोरदार वाऱ्यात उडून जाणारे फलक अशा वस्तू एका जागी एकत्र करून ठेवणे.

    • गरज भासल्यास खिडक्यांच्या काचांवर लावता येतील असे लाकडी बोर्ड तयार ठेवणे.
    • आणीबाणीच्या काळात वापरता येऊ शकणारे जास्त काळ टिकणारे कोरडे अन्नपदार्थ साठवून ठेवणे.

    चक्री वादळ सुरु झाल्यावर

    • रेडियो ऐकत रहाणे (ऑल इंडिया रेडियोवरून हवामानाशी संबंधित सूचना देण्यात येतात).
    • सूचनांवर लक्ष ठेवणे. ह्याद्वारे चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड द्यायची तयारी होते.
    • ही माहिती इतरांपर्यंत पोचवणे.
    • अफवांकडे दुर्लक्ष करणे, अफवा पसरवू नयेत. ह्यामुळे घबराटीचे प्रसंग टळतील.
    • अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवणे.
    • तुमच्या भागाकरता चक्रीवादळाचा इशारा दिला असेल तर आपली नेहेमीची कामे चालू ठेवणे मात्र रेडिओवरून मिळणाऱ्या सूचनांकडे लक्ष देणे.

    तुमच्या भागाकरता चक्रीवादळाची सूचना दिली गेली असल्यास सखल भागातील समुद्र किनारे किंवा तत्सम सखल भागांपासून दूर रहाणे

    • बाहेरील बाजूच्या दरवाजांना भक्कम आधार देणे.
    • जोरदार वाऱ्यामुळे हवेत उडू शकणाऱ्या हलक्या आणि किरकोळ वस्तू एका खोलीत सुरक्षितपणे साठवून ठेवणे.
    • चक्रीवादळाचे केंद्र थेट तुमच्या घरावरून पुढे सरकत असल्यास वारा आणि पाऊस सुमारे अर्धा तास शांत राहतील, मात्र ह्या वेळात घराबाहेर पडू नये कारण त्यानंतर लगेचच विरुद्ध बाजूने सोसाट्याचा वारे वाहू लागतील.

    • घरातील विजेचा मेन्स बंद करणे.
    • शांत रहाणे.

    चक्रीवादळादरम्यान

    वारे शांत होत आहेत असे दिसूनही घराबाहेर पडण्याचा धोका पत्करू नये. कदाचित चक्रीवादळाचा “डोळा” म्हणजेच केंद्रबिंदू तुमच्या जवळून जात असावा. वारे पुन्हा तीव्रपणे वाहून त्यामुळे नुकसान होऊ शकते. चक्रीवादळ ओसरल्याची अधिकृत घोषणा होईपर्यंत घरात थांबून सुरक्षित रहा.

    स्थलांतराची सूचना मिळाल्यावर

    • काही दिवस पुरतील अशा बेताने आपल्याकरता तसेच आपल्या कुटुंबाकरता आवश्यक वस्तू सोबत घेणे. ह्यात औषधे, बाळांसाठी तसेच लहान मुले किंवा वृद्धांसाठीच्या विशेष अन्नपदार्थांचा समावेश असावा.
    • आपल्या परिसरासाठी दर्शवलेल्या योग्य निवारा केंद्राकडे किंवा स्थलांतर केंद्राकडे रवाना होणे.
    • आपल्या मालमत्तेची काळजी करत बसू नये.

    चक्रीवादळानंतरच्या उपाययोजना

    • आपल्याला आपल्या घरी परतायला सांगेपर्यंत निवारा केंद्रात रहाणे.
    • दिव्याच्या खांबांवरील सैल आणि लोंबकाळणाऱ्या तारांपासून दूर रहाणे.
    • वाहन चालवू नये, आपत्कालीन परिस्थिती वाहन काळजीपूर्वक चालवणे.
    • तुमच्या परिसरातील कचरा त्वरित हटवणे.
    • झालेल्या योग्य नुकसानभरपाईची कल्पना संबंधित अधिकाऱ्यांना देणे.

    काय करावे आणि काय करू नये

    आधी

    • स्थानिक हवामानाचा अंदाज जाणून घेण्यासाठी रेडिओ ऐकणे, टीव्ही बघणे आणि वृत्तपत्रे वाचणे. ह्यामुळे थंडीची लाट येण्याची शक्यता असेल तर त्याची माहिती मिळेल.
    • पुरेसे उबदार कपडे जवळ बाळगणे. एकावर एक कपडे अंगावर घातल्यास घातल्यास त्याचा उपयोग होतो.
    • आपत्कालीन साहित्याची बेगमी करून ठेवणे.
    • दीर्घकाळ थंड हवामानात राहिल्यामुळे फ्लू, नाक वाहने किंवा चोंदणे, नाकातून रक्तस्राव यांसारखे आजार होण्याची शक्यता वाढते. अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेणे.

    दरम्यान

    • हवामानविषयक आणि आपत्कालीन प्रक्रियांविषयक माहितीकडे बारकाईने लक्ष ठेवून मिळालेल्या सूचनांनुसार कृती करणे.
    • शक्य तेवढे घरात रहाणे तसेच थंड वारे टाळण्यासाठी कमीत कमी प्रवास करणे.
    • जाडसर कपड्यांच्या एक जोड परिधान करण्याऐवजी हलके, सैलसर बसणारे, वाऱ्यापासून संरक्षण करणारे आणि उबदार लोकरी कपडे एकावर एक परिधान करा. घट्ट कपडे घातल्याने रक्ताभिसरण कमी होते.

    • शरीर कोरडे ठेवणे. घाम आल्यास व भिजल्यास आपले डोके, गळा, हात आणि पायाची बोटे झाकून ठेवणे कारण शरीरातील उष्णता ह्याच अवयवांद्वारे सर्वाधिक उत्सर्जित होते.
    • निव्वळ मोज्यांपेक्षा मिटन वापरणे. अशा प्रकारच्या हातमोज्यांची बोटे एकमेकांना उष्णता देतात आणि त्यामुळे हाताच्या कमीत कमी भागाला थंडी जाणवते.
      1. शरीरातील उष्णता उत्सर्जित होऊ नये यासाठी टोपी आणि मफलर वापरणे. उष्णतारोधक / जलरोधक बूट घालणे.
      2. शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेणे.
      3. पुरेशा प्रतिकारशक्तीसाठी व्हिटॅमिन-सीयुक्त फळे आणि भाज्या खाणे.
      4. शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी नियमितपणे गरम द्रवपदार्थांचे सेवन करणे.
      5. त्वचा कोरडी होऊ नये यासाठी तेल, पेट्रोलियम जेली किंवा बॉडी क्रीम लावून त्वचेचा ओलावा टिकवणे.
      6. वयोवृद्ध आणि लहान मुलांची विशेष काळजी घेणे. एकटे राहणाऱ्या शेजाऱ्यांची, विशेषतः वृद्ध व्यक्तींची, तब्येतीची विचारपूस करणे.
    • गरजेनुसार आवश्यक वस्तूंचा साठा करून ठेवणे. थंडीमुळे पाईप गोठू शकतात म्हणून पुरेसे पाणी साठवून ठेवणे.
    • औद्योगिक नसलेल्या इमारतींसाठी उष्णता रोधनविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना करणे.
    • थंडीच्या लाटेदरम्यान हातापायांची बोटे, कानाची पाळी आणि नाकाचा पुढचा भाग बधिर होणे, पांढरट किंवा फिकट दिसणे यासारख्या हिमबाधेच्या लक्षणांकडे लक्ष ठेवणे.
    • दीर्घ काळ थंड हवामानात राहिल्यास त्वचा फिकट, घट्ट तसेच बधिर होऊ शकते. त्याचप्रमाणे हातापायांची बोटे, नाकाचे टोक किंवा कानाच्या पाळीवर काळसर फोड येऊ शकतात. अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे.

    • थंडीमुळे शरीराच्या ज्या भागावर परिणाम झाला आहे त्या भागाला कोमट (गरम नव्हे) पाण्याने शेक देणे. (त्या पाण्याचे तापमान शरीराच्या इतर भागांना पाण्याचा स्पर्श झाल्यास चटका जाणवणार नाही इतपत असावे.)

    • हुडहुडी भरल्यास दुर्लक्ष करू नका. शरीरातील उष्णता कमी होत असल्याचे हे प्राथमिक लक्षण असून स्वतःला त्वरित चार भिंतींआड बंदिस्त करण्याची ही सूचना असते.
    • हिमबाधा किंवा हायपोथर्मियामुळे (शरीराचे तापमान धोकादायकरीत्या कमी होणे) त्रस्त असलेल्या व्यक्तीसाठी शक्य तितक्या लवकर वैद्यकीय मदत उपलब्ध करणे.
    • पाळीव प्राणी तसेच गुरेढोरे यांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांना घरात आश्रय देणे.
    • अतिथंड हवामानामुळे हायपोथर्मिया होऊ शकतो—यामध्ये शरीराचे तापमान कमी होऊन हुडहुडी भरणे, बोलताना अडखळणे, झोप येणे, स्नायू ताठरणे, श्वासोच्छवास जड होणे, अशक्तपणा आणि/किंवा बेशुद्ध होणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. हायपोथर्मिया हा वैद्यकीय आणीबाणीचा प्रकार आहे आणि ह्यात त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासते.

    • फ्लूसदृश आजार, नाक वहाणे/ चोंदणे यांसारखी लक्षणे खास करून कोविड-19 काळात आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे.
    • प्राथमिक उपचारांची माहिती मिळवण्यासाठी ”विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी प्रथमोपचार (फास्ट)” हे मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करणे.

    हायपोथर्मिया झाल्यास

    • संबंधित व्यक्तीला उबदार ठिकाणी हलवून तिचे कपडे बदलणे.
    • संबंधित व्यक्तीच्या शरीरावर हात फिरवून तसेच कोरडे ब्लँकेट्स, कपडे, टॉवेल किंवा चादरीने शरीर झाकून उबदार ठेवणे.
    • शरीराचे तापमान चढते राहण्यासाठी उष्ण पेय देणे. मात्र मद्य देऊ नये.
    • रुग्णाची अवस्था बिकट झाल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे.

    काय करणे टाळावे

    • थंड तापमानात अधिक काळ रहाणे टाळावे.
    • मद्य सेवन करू नये. मद्य सेवनामुळे शरीराचे तापमान कमी होते, शरीरातील व खासकरून हाताच्या नसा आखडून हायपोथर्मिया होण्याची शक्यता वाढते.
    • हिमबद्ध झालेल्या भागावर मसाज करू नये. मसाजमुळे अधिक नुकसान होऊ शकते.
    • हुडहुडी भरल्यास दुर्लक्ष करू नये. शरीरातील उष्णता कमी होत असल्याचे हे प्राथमिक लक्षण असून स्वतःला त्वरित चार भिंतींआड बंदिस्त करण्याची ही सूचना असते.
    • सदर व्यक्ती पूर्णपणे शुद्धीवर आल्याखेरीज तिला कोणतेही द्रव पदार्थ देऊ नये.

    शेती

    थंडीची लाट तसेच हिम तुषारांमुळे पिकांचे नुकसान होऊन ब्लॅक रस्ट, व्हाइट रस्ट, उशीराने येणारा करपा (लेट ब्लाइट) यांसारखे रोग होऊ शकतात. त्याचप्रमाणे थंडीच्या लाटेमुळे बीजांकुरण, वाढ, फुलोरा, उत्पादन आणि साठवण क्षमता यांसारख्या विविध शारीर क्रियांमध्ये अडथळे येतात.

    काय करावे

    • थंडीमुळे होणाऱ्या आजारांवर बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड, फॉस्फरस (P) आणि पोटॅशियम (K) यांच्या फवारणीसारखे प्रतिबंधक उपाय करणे. ह्यामुळे मुळांची चांगल्या प्रकारे वाढ होते.
    • थंडीच्या लाटेदरम्यान शक्य तेथे सौम्य पद्धतीने वारंवार पृष्ठभागसिंचन (पाण्याची उच्च विशिष्ट उष्णता राखून) करणे. ह्यामुळे द्रवीभवन होऊन उष्णता वातावरणात सोडली जाते.
    • शीतप्रतिरोधक वनस्पती/पिके/वाणांची लागवड करावी.
    • बागायती शेती आणि फळबागांमध्ये आंतरपीक पद्धत अवलंबणे.
    • टोमॅटो, वांगी यांसारख्या भाज्यांसोबत मोहरी किंवा तूरसारखे उंच पिक घेऊन मिश्र पीक पद्धत अवलंबल्यास थंड वाऱ्यापासून संरक्षण मिळते.
    • रोपवाटिका आणि लहान फळझाडे हिवाळ्यात प्लास्टिकने किंवा गवताच्या झापांपासून (उदा. पेंढा किंवा सरकंद गवत) छप्पर तयार करून झाकल्यास किरणोत्सर्ग शोषण वाढते आणिउबदार हवा मिळते.
    • उष्णतारोधनासाठी सेंद्रिय आच्छादन.
    • वाऱ्याचा वेग कमी करण्यासाठी विंड ब्रेक्स किंवा संरक्षक पट्टे उभारणे.

    पशुसंवर्धन / पशुधन

    थंडीच्या लाटेदरम्यान प्राणी आणि पशुधन टिकून राहण्यासाठी अधिक अन्नाची गरज भासते, कारण त्यांच्या शरीरासाठी ऊर्जेचीआवश्यकता वाढते. तापमानातील तीव्र चढ-उतारांचा म्हशी आणि गुरांच्या योग्य प्रजनन काळात त्यांच्या फलनक्षमतेवरपरिणाम होऊ शकतो.

    काय करावे

    • थंडगार वारे सोसायला लागू नयेत ह्यासाठी रात्रीच्या वेळेस प्राण्यांची वस्तीस्थाने सर्व बाजूंनी झाकून ठेवणे.
    • थंडीच्या दिवसात प्राण्यांना, विशेषत:लहान प्राण्यांना झाकून ठेवणे.
    • पशुधन आणि कोंबड्या/ बेडकांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यांना बंदिस्त भागात ठेवणे.
    • पशुधन आहार पद्धत आणि आहारातील पदार्थ सुधारणे.
    • आहारात चरबीयुक्त पूरक पदार्थांचा समावेश करून खाद्याचे प्रमाण, खाण्याची पद्धत आणि चर्वणाचा वेग यावर लक्ष देणे.
    • हिवाळ्यात जास्तीत जास्त सूर्यप्रकाश आत येऊ देणारे आणि उन्हाळ्यात कमी उष्णता शोषणारे हवामानपूरक गोठे बांधणे.
    • अशा प्रकारच्या हवामानासाठी योग्य असलेल्या प्राण्यांची निवड करणे.
    • प्राण्यांच्या बिछान्यासाठी कोरड्या गवतासारखी सामग्री वापरणे.

    काय करणे टाळावे

    • थंडीच्या लाटेदरम्यान प्राण्यांना मोकळ्या जागेत बांधून ठेवू नये किंवा फिरू न देणे.
    • थंडीच्या लाटेदरम्यान पशुमेळ्यांना जाणे टाळावे.
    • प्राण्यांना थंड अन्न आणि थंड पाणी देणे टाळावे.
    • प्राण्यांच्या निवाऱ्यांच्या ठिकाणी दमटपणा आणि धूर होऊ न देणे.
    • रात्री किंवा थंडीच्या वेळी प्राणी मोकळ्या जागेत सोडू नयेत.
    • मृत प्राण्यांचे अवशेष गुरांच्या नेहमीच्या चरण्याच्या ठिकाणी किंवा त्या भागात टाकू नयेत.

    काय करावे आणि काय करणे टाळावे

    काय करावे

    • इशारे, चालू परिस्थिती आणि मार्गदर्शक सूचना जाणून घेण्यासाठी रेडिओ ऐकणे, टीव्ही पाहणे आणि वृत्तपत्रे वाचणे.
    • पावसाचे पाणी साठवण्याची पद्धत अवलंबणे.
    • पावसाळ्यापूर्वी स्थानिक जलस्रोतांची दुरुस्ती आणि पुनरुज्जीवन करणे.
    • दुष्काळ-प्रतिरोधक किंवा कमी पाण्यावर जगू शकणाऱ्या पिकांच्या बियाण्यांचा आणि रोपांचा वापर करणे.
    • मातीतील आर्द्रता टिकवण्यासाठी दुष्काळात लागणारे गवत, झुडुपे आणि झाडे लावणे.
    • भूजल पातळी वाढवण्यासाठी खोल खड्डे खोदणे.
    • पिकांना पाणी देण्यासाठी तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे, पिकांना संध्याकाळी पाणी देणे.
    • पिकांसाठी आपत्कालीन आणि पूरक योजना तयार करून अमलात आणणे.
    • जलसंधारण कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणे.
    • घरगुती वापर झालेले पाणी बागकामाकरता वापरणे.
    • शॉवरखाली उभे राहून स्नान न करता बदलीचा वापर करणे.
    • फरशी घासून स्वछ करण्यासाठी पाणी न वापरते ओले कापड वापरणे.
    • फ्लशिंगकरता कमी प्रमाणात पाणी लागणारी शौचालये बंधने.
    • पाणीगळती रोखण्यासाठी टाकी, नळ आदींची तपासणी नियमिपणे करावी.
    • पाण्याचा शक्य तेवढा पुनर्वापर करणे.
    • दैनंदिन जीवनात जलसंधारणाच्या सवयी अंगीकारणे. आपल्या जागेत खाजगी विहीर असली तरी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने लागू केलेले पाणी वापराबाबतचे निर्बंध काटेकोरपणे पाळणे. (दुष्काळाचा भूगर्भातील पाणीपातळीवरही दुष्परिणाम होतो)

    काय करणे टाळावे

    • पाणी वाया घालवू नये.
    • वृक्षतोड आणि जंगलतोड करू नये.
    • घरांच्या छतावर पडणारे/ जमा होणारे पावसाचे पाणी वाहून जाऊ देऊ नये.
    • तळे, बंधारे, विहिरी, टाक्या ह्यांसारख्या पारंपरिक जलस्रोतांच्या रचनांमधे बदल करू नये.
    • अधिक पाणी लागणारी बियाणे/ पिके वापरात आणू नये. सकाळच्या वेळी पिकांना पाणी घालू नये.
    • दात घासणे, दाढी करणे, भांडी घासणे, कपडेधुनेअशा कामांकरता वाहते पाणी वापरू नये.
    • घरगुती कामांसाठी हाताने धरायच्या होजपाइपचा वापर टाळणे.

    काय करावे आणि काय करणे टाळावे

    तयारी

    • निवासी आणि कार्यालयीन संकुलांसाठी प्रतिसाद योजना तयार करून सराव करणे.
    • स्टॉप, ड्रॉप आणि रोल यासारखे अग्नी बचाव अभ्यास नियमितपणे करणे.
    • सर्व रहिवासी/अभ्यागतांना वेळोवेळी विविध आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी आणि प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण देणे.
    • इमारतींमध्ये स्मोक अलार्म बसवले असून ते चालू स्थितीत असल्याची खातरजमा करणे.
    • आपली निवासी इमारत, कार्यालयीन परिसर धूम्रपान मुक्त क्षेत्र बनवण्याचा प्रयत्न करणे. वश्यकता भासल्यास धुम्रपानाकरता वेगळी जागा राखून ठेवणे.
    • बाहेर पडण्याच्या मार्गांची माहिती करून घेणे.
    • बाहेर पडण्याचे मार्ग आणि जिने अडथळ्यांविना मोकळे ठेवून वेळोवेळी सुटकेच्या मार्गांची तपासणी करणे आणि अडथळे असल्यास ते दूर करणे.
    • आपल्या घर आणि कार्यालय परिसरात आपत्कालीन वाहनांना सहज प्रवेश आणि मार्गक्रमण करता येईल इतकी मोकळी जागा आणि रुंद रस्ते आहेत याची खात्री करून घेणे.
    • आपले घर व कार्यालयात बाहेर पडण्याचे मार्ग आखलेले असल्याची तसेच अग्निशमन यंत्रे व्यवस्थित काम करत असल्याची खातरजमा करून घेणे.
    • आपले घर व कार्यालय परिसराच्या प्रत्येक भागात प्रथमोपचार पेटी असल्याची खात्री करून घेणे.
    • कोणत्याही प्रकारच्या आगीकडे दुर्लक्ष करून नये.
    • आपल्या घरात वर्तमानपत्राची रद्दी किंवा ज्वलनशील पदार्थ साठवू नयेत.
    • कचरा, कोरडी पाने किंवा झाडे-झुडुपे जाळू नये. महापालिकेच्या ठरलेल्या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावणे.
    • ज्वलनशील द्रव पदार्थ घरात साठवू नयेत.
    • काडेपेट्या आणि लायटर लहान मुलांपासून दूर बंदिस्त ठेवणे.
    • कागद, कपडे आणि ज्वलनशील द्रव पदार्थ हीटर, चुली किंवा स्टोव्हजवळ ठेवू नका.
    • एलपीजी गॅस चूल उंच प्लॅटफॉर्मवर ठेवणे; जमिनीवर ठेवू नये.
    • स्वयंपाक झाल्यानंतर गॅस सिलिंडरचा व्हॉल्व आणि गॅस स्टोव्हचा नॉब बंद करणे.
    • काडेपेट्या, सिगारेटची थोटके इत्यादी कचऱ्याच्या टोपलीत टाकू नये.
    • तेलाचे दिवे, अगरबत्त्या किंवा मेणबत्त्या लाकडी पृष्ठभागावर किंवा ज्वलनशील पदार्थांजवळ ठेऊ नये.
    • स्वयंपाक करतेवेळी सैल, सुळसुळीत आणि सिंथेटिक कपडे परिधान करू नयेत.
    • जळत्या आगीवरून कधीही कोणतीही वस्तू उचलण्याचा प्रयत्न करू नये.
    • आपल्याला आवश्यक वीजभाराचा अंदाज घेऊन विजेचा पुरवठा योग्य प्रमाणात होत आहे याची खातरजमा करणे. असे केल्याने जास्त भारामुळे होणारे तापमान वाढणे टाळता येईल.
    • वीज गळती व शॉर्टसर्किट टाळण्यासाठी प्रमाणित विद्युत उपकरणे, स्विचेस आणि फ्यूजेस वापरणे. तसेच अर्थ-लीकेज सर्किट ब्रेकर्स (ईएलसीबी) पुरेशा संख्येने बसवले असल्याची खात्री करून घेणे.
    • वीज जोडण्या विस्कळीत नसल्याबद्दल नियमित तपासणी करणे. गालिच्याखाली किंवा गर्दीच्या भागात वीजतारा ओढू नयेत.
    • विद्युत उपकरणे वापरून झाल्यावर बंद करून सॉकेटमधून प्लग काढून ठेवणे.
    • प्रदीर्घ कालावधीसाठी घराबाहेर जायचे असल्यास ‘मेन्स’ स्विच बंद करणे.
    • एकाच सॉकेटमधे जास्त विद्युत उपकरणे जोडू नयेत.
    • दैनंदिन वापराच्या भागात मोठी विद्युत संचमांडणी नसल्याची खात्री करून घेणे.

    आग लागल्यास

    • इतरांना सावध करणे आणि अग्निशामक दलाला कळवणे.
    • न घाबरता शांत रहाणे.
    • सर्व विद्युत उपकरणांचे प्लग काढून ठेवणे.
    • उपलब्ध उपकरणांच्या साहाय्याने आग विझवायचा प्रयत्न करणे.
    • दरवाजे आणि इतर उघडी ठिकाणे बंद करणे. धूर पसरू नये ह्यासाठी दरवाजांखाली फटीत ओल्या कापडाचे बोळे ठेवणे. श्वसनासाठी ओला कपडा तोंडावर ठेवा.
    • आग नियंत्रणाबाहेर जात असल्यास तिथून त्वरित बाहेर पडणे.
    • आपल्या चीजवस्तू गोळा करायला तिथे जाऊन नये.
    • आगीमुळे भाजल्यास वेदना कमी होईपर्यंत त्या जागेवर पाणी ओतणे.

    तुम्ही आगीत अडकल्यास

    • तुम्ही जिथे असाल तिथे जमिनीलगत (बसून) रहाणे.
    • दरवाजा उघडण्यापूर्वी तो किती तापला आहे ते तपासणे. पालथ्या हाताने दरवाजाची वरची बाजू, नॉब आणि चौकटीला स्पर्श करून तापमान तपासणे. दरवाजा तापला असल्यास उघडू नये.
    • दरवाजातून बाहेर पडत येत नसेल तर त्यासाठी खिडकीचा वापर करणे. मात्र खिडकीतून उंचावरून उडी मारावी लागणार असेल तर काहीतरी वस्तू हलवून , लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणे.
    • खोलीतून बाहेर पडताना आपल्या मागे दरवाजा बंद करून घेणे. असे केल्याने आग झपाट्याने पसरणार नाही. जाताना सरपटत जाणे.
    • तुमच्या कपड्यांना आग लागल्यास ती विझण्यासाठी जमिनीवर लोळण घेऊन गोल फिरणे.

    तुम्हाला आग लागल्याचा इशारा (फायर अलार्म) ऐकू आला, तर

    • सर्वात जवळच्या उपलब्ध मार्गाने त्वरित बाहेर पडणे.
    • सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद करणे.
    • लिफ्टचा वापर न करता पायऱ्या वापराने.
    • अग्निशमन दल आल्यावर त्यांना मदत करणे.
    • अग्निशमन इंजिनसाठी रस्ता मोकळा ठेवणे त्यामुळे घटनास्थळी लवकर पोचणे त्यांना शक्य होईल.
    • आपली वहाने फायर हायड्रंट्स किंवा जमिनीखालील स्थिर पाण्याच्या टाक्यांजवळ उभी करू नयेत.
    • अग्निशमन कर्मचाऱ्यांना पाण्याच्या स्रोतांपर्यंत (नळकूप, तलाव, स्थिर टाक्या इ.) पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करणे.

    काय करावे आणि काय करणे टाळावे

    आधी

    • तुमच्या घरावर कोसळल्याची शक्यता असलेली झाडे कापून टाकणे किंवा छाटणे.
    • 30-30 हा महत्वाचा नियम पाळणे. वीज चमकताना पाहिल्यानंतर 30पर्यंत आकडे मोजणे. मोजणी पूर्ण होण्याअगोदर गडगडाट ऐकू आला तर त्वरित घरात जाणे. गडगडाट ऐकल्यानंतर पुढची सुमारे 30 मिनिटे कोणतेही काम करू नये.

    • विद्युत उपकरणांचे नुकसान टाळण्यासाठी अर्थिंग नेहमी होत राहूद्यात.
    • आपले घर, उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू संरक्षित करण्यासाठी सर्ज प्रोटेक्टर, लाइटनिंग रॉड किंवा लाइटनिंग प्रोटेक्शन सिस्टम बसवण्याबाबत विचार करणे.

    वीजा चमकत असताना

    घरात असल्यास

    • सर्व विद्युत उपकरणांचे प्लग काढून टाकणे. वायर असलेले टेलिफोन, विद्युत उपकरणे, चार्जर इत्यादी वापरू नये.
    • दरवाजे आणि खिडक्यांपासून दूर रहाणे. व्हरांड्यात थांबू नये.
    • पाण्याचे नळ आणि धातूच्या पाइपांना स्पर्श करू नका. वाहते पाणी वापरू नका.

    घराबाहेर असल्यास

    • एखाद्या घरात/ इमारतीत शिरणे. लोखंडी छत/ पत्रे असलेल्या ठिकाणी थांबू नये.
    • जर मोकळ्या आकाशाखाली असाल, तर वाकून बसणे. जमिनीवर झोपू नये किंवा हात टेकवू नये.
    • झाडाजवळ अथवा झाडाखाली आसरा घेऊ नये. जलस्रोतापासून दूर रहाणे.
    • घराबाहेर असताना विजांचा लखलखाट अथवा गडगडाट सुरु झाल्यास एखाद्या वाहनात अथवा बैठ्या घरात आश्रय घेणे.
    • जर तुम्ही कार/बस/आच्छादित वाहनात असाल, तर तिथेच थांबणे.
    • धातूच्या वस्तू वापरू नयेत; वीज आणि टेलिफोनच्या तारांपासून दूर रहाणे.
    • पूल, तलाव, बोटीत, पाण्यात असाल तर त्वरित बाहेर येणे.
    • डोंगरशिखर, मोकळी मैदाने आणि समुद्रकिनाऱ्यांपासून दूर रहाणे.

    नंतर

    • पडलेल्या वीजवाहक तारा आणि झाडांकडे लक्ष देणे. त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना कळवा.
    • बाधित व्यक्तींवर उपचार
    • आवश्यक वाटल्यास सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) देणे.
    • त्वरित वैद्यकीय मदत मागवणे.

    काय करावे आणि काय करणे टाळावे

    आधी

    • भारतीय मानक ब्युरोच्या नियमावलीनुसार घरे बांधणे.
    • त्सुनामीच्या धोक्यांबाबत स्वतःला आणि कुटुंबियांना शिक्षित करणे.
    • आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडणारा एक किट बनवून त्या परिस्थितीत संपर्काची योजना बनविणे.
    • आपल्या रस्त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची आणि किनाऱ्यापासून किंवा इतर अति जोखमीच्या जलस्रोतांपासूनचे अंतर जाणून घेणे.
    • आपण पर्यटक असाल, तर स्थानिक पातळीवरील त्सुनामी बचाव प्रोटोकॉलची माहिती घेणे.
    • भूकंप होत असताना आपण किनारपट्टीच्या भागात असाल, तर त्सुनामीच्या इशाऱ्याबद्दल जाणून घेण्यासाठी आपले रेडिओ चालू करणे.
    • आपल्या समुदायाची/ गटाची धोक्याचा इशारा देणारी प्रणाली आणि आपत्ती व्यवस्थापन योजना जाणून घेणे, यात सुटकेचे मार्ग समाविष्ट असतील. ज्ञात मार्गांद्वारे सुटका करून घेण्याचा सराव करणे.
    • सर्वाधिक उंचीवरील मैदानाबाबत माहिती करून घेऊन तिथे पोचण्याचा सर्वात सुरक्षित, जवळचा आणि सोपा मार्ग जाणून घेणे. शाळेच्या स्थलांतर योजनेनुसार तुम्ही तुमच्या मुलांना शाळेतून किंवा इतर ठिकाणाहून आणावे लागेल हे जाणून घेणे. सुनामीच्या सतर्कतेच्या किंवा इशाऱ्याच्या वेळी टेलिफोन लाईन व्यस्त असू शकतात आणि शाळांकडे किंवा शाळांमधून जाणारे मार्ग गजबजलेले असू शकतात, हे लक्षात घेणे.

    त्सुनामी दरम्यान

    • शांत रहाणे. घाबरून जाऊ नये.
    • सरकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे.
    • त्वरित जमिनीने वेढलेल्या ठिकाणी उंच भूभागाकडे जाणे.
    • समुद्रकिनाऱ्यापासून दूर रहाणे.
    • आपल्या चीजवस्तूंपेक्षा आपलाजीव वाचवणे.
    • अर्भके, वृद्ध, तसेच शारीरिकदृष्ट्या अक्षम व्यक्ती यांसारख्या विशेष मदतीची गरज लागू शकणाऱ्यांना सहाय्य करणे.
    • आपण पाण्यात असाल, तर राफ्ट, लाकडी ओंडका यासारख्या तरंगणाऱ्या वस्तूला पकडून ठेवणे.
    • आपण बोटीत असाल तर लाटांच्या दिशेने तोंड करून समुद्राच्या बाजूला जायला लागा. तुम्ही एखाद्या बंदरात असाल तर जायला लागा.

    नंतर

    • अधिकाऱ्यांनी सुरक्षित असल्याचे सांगितल्यानंतरच घरी परतणे.
    • आपत्तीग्रस्त भागांपासून दूर रहाणे.
    • पाण्यातील कचऱ्यापासून दूर रहाणे.
    • जखमी किंवा अडकलेल्या लोकांना मदत करायच्या अगोदर स्वतःला लागलेल्या जखमांची तपासणी करून गरज असल्यास प्रथमोपचार घेणे.
    • कुणाला बचावकार्याची गरज असेल, तर मदतीसाठी योग्य साधनसामग्री असलेल्या तज्ञांना बोलवणे.
    • अर्भके, वृद्ध, तसेच शारीरिकदृष्ट्या अक्षम व्यक्ती यांसारख्या विशेष मदतीची गरज लागू शकणाऱ्यांना सहाय्य करणे.
    • ताज्या माहितीसाठी रेडिओ किंवा दूरदर्शनचा वापर करणे.
    • ज्या इमारतींच्या आजूबाजूला पाणी साचले आहे, त्या टाळणे कारण त्सुनामीच्या पाण्यामुळे बांधकाम तडकण्याची किंवा भिंती कोसळण्याची शक्यता असते.
    • इमारत किंवा घरात पुनर्प्रवेश करताना सावधगिरी बाळगणे.
    • इजा टाळण्यासाठी संरक्षक कपडे परिधान करणे आणि साफसफाई करताना सावधगिरी बाळगणे.
    • उघड्या डब्यातील अन्न किंवा पेय सेवन करू नये.
    • घर रिकामे करावे लागत असल्यास तुम्ही कुठे जात आहात याबद्दल एक संदेश लिहून ठेवणे.
    • अफवा पसरवू नका नये​ तसेच त्यावर विश्वास ठेवू नये.

    एनडीएमएद्वारे देण्यात येणाऱ्या ”काय करावे आणि काय करणे टाळावे” ह्या पुस्तिकेची लिंक:

    काय करावे आणि काय करणे टाळावे पुस्तिका