महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणांतर्फे शासन आणि गट/ समुदायातील भागधारकांना माहिती देण्यासाठी, संवेदनशील बनवण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी विविध कार्यशाळा आणि चर्चासत्रांचे आयोजन केले जाते. आयोजित केली गेलेल्या प्रमुख कार्यशाळा आणि परिसंवाद पुढीलप्रमाणे :
उष्मालाटेसंदर्भात आंतरराष्ट्रीय कार्यशाळा 2025
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आयोजित केलेल्या उष्मालाटेसंदर्भात आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत तीव्र उष्णतेला तोंड देण्यासाठी शहर स्तरीय उष्णता उपाययोजना आराखडा राबवायचे निश्चित करण्यात आले. ”शहर-स्तरीय उष्णता कृती आराखड्यांची प्रगती: संवेदनक्षम समुदायांसाठी बहुउद्देशीय अनुकूलन (शहर-स्तरीय हीट ॲक्शन प्लॅन्सची प्रगती: लवचिक समुदायांसाठी बहु-क्षेत्रीय अनुकूलन)” असे ह्या कार्यशाळेचे विषयसूत्र होते. ह्यावेळी भारतातील उष्णतेच्या लाटांची तीव्रता वाढण्याची प्रमुख कारणे म्हणजे हवामान बदल, शहरीकरण आणि अर्बन हीट आयलंड (यूएचआय) प्रभाव यांवर चर्चा करण्यात आली.
कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या माननीय मुख्य सचिवांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या भाषणात, त्यांनी बहुउद्देशीय अनुकूलन धोरणे आखण्याची तातडीची आवश्यकता, प्रारंभिक इशारा प्रणाली मजबूत करणे आणि तीव्र उष्णतेच्या धोक्यांपासून बचाव करण्यासाठी आंतरसंस्थात्मक समन्वय वाढवण्याचे महत्त्व यावर भर दिला. त्यांनी महाराष्ट्राची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करताना शहरी गरीब, वृद्ध, मुले आणि आधीपासून आरोग्य समस्या असलेल्या व्यक्तींसाठी, आकडेवारीवर आधारित आणि विज्ञान-साधित धोरणे राबवून दुबळ्या समुदायांचे संरक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
या कार्यशाळेत 250 हून अधिक प्रतिनिधी एकत्र आले होते आणि यामध्ये सरकारी अधिकारी, शहर नियोजनकर्ते, संशोधक आणि यूएनडीआरआर, यूएनईपी, यूसी बर्कले, हार्वर्ड विद्यापीठ आणि युनायटेड नेशन्स ह्युमन सेटलमेंट प्रोग्रॅम यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ह्यावेळी त्यांनी उष्णतेशी संबंधित आरोग्य अनुकूलन, पायाभूत सुविधांची संवेदनशीलता आणि उष्णता कृती आराखड्यांसाठी वित्तपुरवठा कार्यतंत्राबद्दल चर्चा केली. ह्या सत्रांमध्ये धोरणांचे प्रमाणीकरण, सामग्री संकलन, शहरी शीतन योजनांबद्दल विचारविनिमय झाला. ह्यामध्ये खास करून निवडक शहरांमधील एचएपीची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी आणि सीइइडब्ल्यू, एनआरडीसी आणि एसएफसी यांसारख्या संस्थांसोबतच्या सहकार्यावर भर देण्यात आला. एक पूर्ण सत्रभर भविष्यातील सहकार्यांबद्दल चर्चा झाली. यात कूल रिडिझाइन प्रकल्पावरील यूएनईपी-एनडीएमए भागीदारी, यूसी बर्कलेसह संशोधन सहकार्य आणि प्रगत उष्णता अंदाजासाठी आंतर-एजन्सी कृती दलाची स्थापना यासह कृती करावयाच्या प्रमुख मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला. कार्यशाळेचा समारोप तीव्र उष्णतेच्या घटनांपासून दीर्घकालीन आणि शाश्वत संवेदनशीलता निर्माण होण्याकरता भारतीय उष्णता कृती आराखड्यांसाठी जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धती अंगिकारण्याच्या दृढ निश्चयाने करण्यात आला. महाराष्ट्राचे धोरणाधारित आणि विज्ञान-साधित उष्णता अनुकूलन धोरणांमधील नेतृत्व एक नमुना म्हणून अधोरेखित केले गेले. ह्यामुळे राज्याच्या आपत्ती पूर्वतयारी आणि हवामान संवेदनशीलत्यासाठी राज्याच्या समर्पित कार्याला बळकटी प्राप्त झाली.