कोल्हापूरच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पुढाकार घेऊन महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एसडीएमए) मार्गदर्शनाखाली पन्हाळा किल्ल्याच्या ऐतिहासिक वारसा स्थळासाठी आगळी वेगळी अशी जिल्हा आपत्ती योजना (डीएमपी) 2024-25 आखली. सदर योजना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एनडीएमए) सप्टेंबर 2017” च्या सांस्कृतिक वारसा स्थळे आणि परिसरासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठीच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शक तत्वांचे पालन करून आखण्यात आली.”