बंद

    राज्याचा दृष्टिक्षेप

    महाराष्ट्र भारताच्या पश्चिम व मध्य द्वीपकल्पीय प्रदेशात वसलेला असून त्याचे क्षेत्रफळ 308,000 चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्राला अरबी समुद्राचा 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. पश्चिमेला सह्याद्री पर्वतरांगा, उत्तरेला सातपुडा पर्वतरांगा आणि पूर्वेला भामरागड-चिरोली-गायखुरी पर्वतरांगा या त्याच्या भौगोलिक सीमा आहेत. प्रशासकीयदृष्ट्या राज्याची सहा महसूल विभाग आणि 36 जिल्ह्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

    येथील हवामान उष्णकटिबंधीय मोसमी इथे तीन वेगवेगळे ऋतुमान अनुभवास येतात. मार्च ते जून कालावधीत उन्हाळा, जून ते सप्टेंबर पावसाळा आणि नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये हिवाळा असतो.

    ह्या शिवाय, महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण भौगोलिक स्थितीचा पावसाच्या पद्धतीवर लक्षणीय परिणाम होतो. नैर्ऋत्य मोसमी पावसाचा फायदा कोंकण विभागाला होऊन तिथे पुरेसा पाऊस पडतो, तर पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये असलेल्या मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागात वारंवार अवर्षणसदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागतो. हिवाळ्याच्या महिन्यांत महाराष्ट्राच्या अंतःक्षेत्रात राज्याच्या किनारी भागाच्या तुलनेत कमी तापमान असते.

    उन्हाळ्यादरम्यान महाराष्ट्रातील अकोला, भंडारा, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ हे 15 जिल्हे उष्णतेच्या लाटेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असतात.