महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सौम्यीकरण योजना ठरवण्यासाठी गावनिहाय भूस्खलन जोखीम विश्लेषण करत भूस्खलन संवेदनशीलता आणि जोखीम मूल्यमापन केले. ह्यामध्ये रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग, अहमदनगर, नाशिक, पालघर आणि सांगली ह्या 11 जिल्ह्यातील प्राधान्याने भूस्खलन निवारणाची कामे हाती घेण्यात येणार असलेल्या 483 गावांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाला 15 जानेवारी 2025 रोजी झालेल्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेतील (डब्ल्यूसीडीएम) प्रतिष्ठित “आपत्ती जोखीम कमीकरण” पुरस्काराने गौरवण्यात आले. हा सन्मान अभिनव भूस्खलन व्यवस्थापन योजनेसाठी देण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (एसीएस) डॉ. सोनिया सेठी यांनी हा पुरस्कार मा. केंद्रीय मंत्री श्री. पीयूष गोयल यांच्या हस्ते स्वीकारला.